विझलेल्या मेणबत्त्या
मंगला सामंत
१३ मार्च २०२१
समाजामध्ये जेव्हा वाईट घटना घडतात, तेव्हा त्या घटनेभोवती, सामाजिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक आणि काही मर्यादेपर्यंत स्त्री-पुरुषांची जैविक ठेवण यांचे वलय असते. या सर्व विषयांपर्यंत आपल्याला जेव्हा पोहोचता येते, तेव्हाच त्या घटनेमागील कारणे कळतात आणि जेव्हा कारणे कळतात, तेव्हाच या घटनेवरचे उपाय हाती येतात. इथे विषय आहे तो स्त्रिया व मुला-मुलींवरचे लैंगिक अत्त्याचार आणि बलात्काराचा. अशा घटना घड…